हैडलाइन

कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक पदाचा कार्यभार

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अमोल महाजन यांनी आज विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई येथील सहायक संचालक (माहिती) या पदाचा पदभार आज मध्यान्यपूर्व स्वीकारला आहे. या पदावर कार्यरत असलेल्या संजीवनी जाधव यांच्या बदली नंतर पद रिक्त झाले होते. कोकण विभागातील शासकीय जनसंपर्क, माहिती प्रसारण आणि प्रसारमाध्यमांशी समन्वय साधण्याची मुख्य जबाबदारी आता महाजन यांच्याकडे असणार आहे. या मुख्य पदासोबतच त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग येथील माहिती अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभारही स्विकारुन आपल्या नवीन प्रशासकीय टप्प्याची सुरुवात केली आहे.


अमोल महाजन यांचा शासकीय जनसंपर्क आणि प्रशासकीय क्षेत्रातील कार्यकाळ अत्यंत प्रदीर्घ, वैविध्यपूर्ण आणि उल्लेखनीय राहिलेला आहे. सन २००० ते २०१० या कालावधीत त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, बीड येथे आपल्या सेवेची सुरुवात करत जनसंपर्क व माहिती प्रसारण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यानंतर २०१० ते २०११ या काळात छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत राहून त्यांनी विभागीय स्तरावरील प्रशासकीय अनुभव अधिक समृद्ध केला. २०१२ ते ऑक्टोबर २०२२ या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, जालना येथे उपसंपादक म्हणून जबाबदारी सांभाळताना शासकीय प्रकाशने, वृत्तलेखन आणि कार्यालयीन प्रशासनात आपली वेगळी छाप पाडली.

यानंतर ऑक्टोबर २०२२ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, अहिल्यानगर (अहमदनगर) येथे माहिती अधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला. अहिल्यानगरमधील कार्यकाळात त्यांनी राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावी प्रचार-प्रसार केला. 

बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अहिल्यानगर येथील प्रदीर्घ व समृद्ध अनुभवाच्या जोरावर आता 04 ऑगस्ट 2026 पासून त्यांनी कोकण विभागीय कार्यालयात सहाय्यक संचालक या पदावर पदार्पण केले आहे. कोकण विभागातील विकासकामे, शासकीय धोरणे आणि योजनांचा प्रचार-प्रसार अधिक गतिमान करणे, तसेच रायगड जिल्ह्याचा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळताना माध्यम प्रतिनिधींशी सुसंवाद अधिक दृढ करणे याला आपले प्राधान्य राहील, असा विश्वास त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला आहे.

                                                        


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...