हैडलाइन

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मधील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला ५० कोटी देण्याचा निर्णय

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५० कोटी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतला आहे. या निधीमुळे जिजाऊंच्या स्मारकाचा कामाला तत्काळ गती देता येणे शक्य होणार आहे.

सिंदखेडराजामधील या स्मारक आणि जिजाऊसृष्टीच्या कामासाठी २०२४ साली ५० कोटी जाहीर करण्यात आले होते. या निधीमधून सिंदखेडराजा जवळील जिजाऊसृष्टीचे काम सुरू करण्यात आले होते. आजवर या कामांसाठी २७ कोटींचा निधी खर्च झाला असून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र शहरातील लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील प्रत्यक्ष स्मारकाच्या कामालाही सुरुवात करता यावी यासाठी अजून ५० कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निधीतून जिजाऊ माँसाहेबांच्या स्मारक तसेच या परिसरातील रस्ते आणि आजूबाजूच्या इतर सोयी सुविधांचा विकास केला जाईल. स्थानिक नगरपालिकेकडून प्रस्ताव मागवून पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या कामाला गती देण्यात येणार असून, लवकरात लवकर या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. 

यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार शशिकांत खेडेकर हेदेखील यावेळी उपस्थित होते.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...