हैडलाइन

सायबर गुन्हेगारांना सिमकार्ड पुरवणाऱ्या रॅकेटवर पोलिसांचा छापा, बिहारमधून दोघांना अटक

मुंबईतील सायबर फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करताना दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. CEO Fraud प्रकरणात सिम कार्ड पुरविणाऱ्या POS व त्याच्या पुढील हस्तकाचा शोध घेत बिहार आणि झारखंड येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून ७ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

तपासादरम्यान आरोपींनी बनावट कागदपत्रे आणि ई-केवायसीच्या माध्यमातून सिमकार्ड मिळवून ते सायबर फसवणुकीसाठी वापरल्याचे समोर आले. या सिमकार्डचा वापर करून विविध ठिकाणी नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती.
पोलिसांनी आरोपींकडून १६७ अॅक्टिव्ह सिमकार्ड, मोबाईल फोन तसेच सिमकार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोन, मेसेज किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये. तसेच सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा आणि संबंधित प्रकरणाची माहिती Sanchar Saathi Portal वर तपासावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या कारवाईत दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तसेच प्रताप जाधव आणि मंगेश गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...