हैडलाइन

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘रन अँड राइड’, २०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन प्रॅक्टिस रन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या संकल्पनेवर आधारित ‘रन अँड राइड’ रॅली आज उत्साहात पार पडली.

    उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी मारुती मंदिर येथून या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. ही रॅली मारुती मंदिर येथून निघून जेल नाका मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचली, जिथे रॅलीची सांगता झाली. रॅलीच्या प्रारंभी कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या मानसी मराठे यांनी सर्व सहभागी धावपटू व क्रीडाप्रेमींचा वॉर्मअप करून घेतला.

     या उपक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, कोकण कोस्टल मॕरेथाॕनचे सचिन मराठे, केतकी लेले, स्नेहल कलाल, महेश खेडेकर, अभय सुर्वे, अनिरुध्द कुलकर्णी यांच्यासह रा. भा. शिर्के प्रशालेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध संघटनेचे खेळाडू असे सुमारे २०० हून अधिक धावपटू, क्रीडाप्रेमी व नागरिक सहभागी झाले होते. 

    


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...