हैडलाइन

महापौर बंगल्यातील कर्मचाऱ्यांसोबत महापौरांनी साजरी केली 'कृतज्ञतेची राखी

"रक्षाबंधन सण हा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो प्रेम, विश्वास, काळजी आणि संरक्षणाचा अतूट धागा आहे. दिवस-रात्र सेवा देणारे महापौर बंगल्यातील सर्व कर्मचारी हे आमचे कुटुंबच आहेत," असे भावोद्गार मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काढले.


भायखळा स्थित महापौर निवासस्थानी महापौर बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधन सण कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.


महापौर रितू तावडे व आमदार चित्रा वाघ यांनी कर्मचाऱ्यांना स्वतः राखी बांधून त्यांचे औक्षण केले. तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सण-उत्सवाच्या काळातही कर्तव्यावर तत्पर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या छोटेखानी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...