हैडलाइन

लोकमान्य टिळक हायस्कूलमधील शिक्षक वर्गाचा शिक्षक दिन उत्साहात साजरा; नगरसेविका आशा मराठे यांच्या पुढाकाराने शिक्षकांचा सन्मान

मुंबईतील लोकमान्य टिळक हायस्कूलमधील शिक्षक वर्गाने आज शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. टिळक नगर एज्युकेशन सोसायटीच्या लोकमान्य टिळक हायस्कूलमधील प्री-प्रायमरी, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून राजकीय नेत्या कांता नलावडे यांची देखील उपस्थिती लाभली. यावेळी शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.


वॉर्ड क्रमांक १५२च्या नगरसेविका आशा सुभाष मराठे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “शिक्षक वर्गाचा सत्कार हा एका शिक्षिकेच्या हातून होणे, हा जणू योगच जुळून आला आहे.”

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासात शिक्षकांचे योगदान मोलाचे असून, शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच आयुष्याची योग्य दिशा देण्याचे काम करतात. शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


Most Popular News of this Week

विद्याविहार रेल्वे...

घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील...

‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ...

भारतीय चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने, भारदस्त आवाजाने आणि...

मंत्री छगन भुजबळ व माजी...

सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी,...

विद्याविहार ईस्ट-वेस्ट...

बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारा नवनिर्मित विद्याविहार ईस्ट-वेस्ट कनेक्टर...

वडाला में कांग्रेस ने मनाया...

मुंबई के वडाला रेलवे स्टेशन के बाहर कांग्रेस की ओर से ‘लोकतंत्र का काला...

MLA सना मलिक शेख की पहल पर भव्य...

युवाओं के रोजगार और बेहतर भविष्य को ध्यान में रखते हुए, MLA सना मलिक शेख की ओर...