हैडलाइन

प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक किशोर मन्याल यांच्या खार येथील राहत्या घरी विराजमान गणरायाला भावपूर्ण निरोप

उद्योजक आणि समाजसेवक किशोर मन्याल यांच्या राहत्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे काल ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

गणेशोत्सवाची परंपरा जपत मन्याल कुटुंबीयांनी यंदाही पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. यावेळी त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना शेणापासून तयार केलेली गणपती बाप्पांची मूर्ती, शेणाचे दिवे, मोदक आणि इतर गौमय वस्तूंची भेट देण्यात आली.

यावेळी किशोर मन्याल यांनी सांगितले की, गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवण्यासाठी अशा प्रकारे सण साजरे करणे गरजेचे आहे. पर्यावरणपूरक गणपतीमुळे मनाला आनंद मिळतो. दरवर्षी गणेशोत्सवात घराची सजावटही वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येते.


विसर्जनासाठी इमारतीखालीच कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामध्येच गणरायाचे विसर्जन करण्यात येते, असेही त्यांनी सांगितले. समाजसेवक म्हणून समाजातील सर्वांनी प्रेमाने आणि एकजुटीने राहावे, हा संदेशही किशोर मन्याल यांनी यावेळी दिला.

यानंतर ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढत कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी संपूर्ण मन्याल कुटुंबीयांनी आनंद आणि भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला.


Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या...

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. भाजपा...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सूखे को लेकर केंद्र सरकार से...

महाराष्ट्र में भीषण सूखे की स्थिति को लेकर शिवसेना के मुख्य नेता और राज्य...

विद्याविहार रेल्वे...

घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील...