हैडलाइन

आधार सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांना विशेष प्रशिक्षण

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण आधार सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र चालक व ऑपरेटर यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रशिक्षणात आधार नोंदणी, अद्ययावतीकरण आणि सेवा प्रक्रियेतील विविध महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.

पालघर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, दुर्गम आणि आदिवासी भागातील लोकसंख्या तसेच ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांची आधार सेवांसाठी असलेली गरज लक्षात घेता, आधार केंद्र चालकांची कार्यक्षमता आणि सेवा प्रक्रियेतील अचूकता वाढविणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

UIDAIच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

प्रशिक्षणादरम्यान आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करताना UIDAIच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन, आवश्यक कागदपत्रांची योग्य पडताळणी, नोंदणी प्रक्रियेत घ्यावयाची दक्षता तसेच सेवा देताना उद्भवणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचे निराकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

आधार केंद्र चालकांनी प्रत्यक्ष कामकाजात अनुभवलेल्या अडचणी आणि नागरिकांना सेवा देताना येणाऱ्या विविध प्रश्नांवरही प्रशिक्षणादरम्यान चर्चा करण्यात आली. सॉफ्टवेअर, उपकरणे आणि सेवा प्रक्रियेशी संबंधित समस्यांवर मार्गदर्शन मिळाल्याने केंद्र चालकांना दैनंदिन कामकाज अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यास मदत होणार आहे.

दुर्गम भागातील नागरिकांना संवेदनशील आणि दर्जेदार सेवा

आधार सेवा ही विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची असल्याने नागरिकांना सेवा देताना केंद्र चालकांनी सौजन्यपूर्ण वर्तन, पारदर्शकता आणि जबाबदारी यांना प्राधान्य द्यावे, यावर प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला.

दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग नागरिकांना आधार सेवा घेताना अनावश्यक अडचणी येऊ नयेत, यासाठी केंद्र चालकांनी संवेदनशीलतेने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांना UIDAIच्या नियमावलीसह सेवा प्रक्रियेतील आवश्यक बाबी आणि प्रत्यक्ष कामकाजातील तांत्रिक अडचणींबाबत अधिक स्पष्टता मिळाली आहे. परिणामी पालघर जिल्ह्यातील आधार सेवा अधिक कार्यक्षम, सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यास हातभार लागणार आहे.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...