आदिवासी समाज, नवी मुंबई यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुंडण आंदोलन आणि उपोषण सुरू करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष द्यावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता आणि संबंधित प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने आदिवासी समाजाच्या मागण्यांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली.
जोपर्यंत शासन या आंदोलनाची दखल घेऊन आपल्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, मनपा आयुक्त आदिवासी लोकांना न्याय देत नसल्याने आज मनपा मुख्यालय बाहेर चूल बांधून जेवण बनवणार आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत इथेच उपोषणला बसणार, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.