हैडलाइन

पोलिस भरती प्रवेश प्रक्रियेत शारीरिक चाचणीचे गुण कमी करणे ही बाब निषेधार्ह - जयंत पाटील

 मुंबई:  महाराष्ट्र शासनाने पोलिस भरती प्रवेश प्रक्रियेत मुलभूत बदल केला आहे. शारीरिक चाचणीचे गुण कमी करण्यात आले आहेत. हा शासनाचा निर्णय निषेधार्ह आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.


यापूर्वी पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेतमध्ये १०० गुण लेखी आणि १०० गुण शारीरिक परीक्षेसाठी होते. परंतु आता शारीरिक क्षमतेचे गुण कमी करण्यात आले आहेत असेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील म्हणाले.  पोलिस म्हटले की, त्याला रस्त्यावर, मैदानावर अतिशय वेगाने धावावे लागते त्यामुळे सक्षम असे पोलिस पोलिसदलात असणे आवश्यक आहे असेही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सांगितले. 

राज्य राखीव दलामध्ये सुध्दा हीच पद्धत अवलंबणार का अशी विचारणा करतानाच राज्य सरकारने निधड्या छातीच्या सक्षम लोकांना टाळण्यासाठी की काय त्यांचे ५० गुण कमी केले आहेत. याचा परिणाम शारीरिक क्षमतेवर पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांच्या भरतीवर होणार आहे असेही आमदार जयंतराव पाटील म्हणाले. 

मेगा भरतीच्यावेळी अशी घोषणा करण्यात आली. यामध्ये अचानक बदल करून कुणाचं हित मुख्यमंत्र्यांना करायचं आहे. अचानक केलेल्या बदलाचा निषेध प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे.
फार हुशार माणसं पोलिस दलात आवश्यक आहे. त्याचं समर्थन आम्हीही करु परंतु त्याचे १५० गुण करा. शारीरिक क्षमतेचे १०० गुण कमी करणं योग्य नाही कारण ग्रामीण भागातील मुलं शारीरिक ताकदीने सक्षम आहेत. ते लेखीमध्ये कमी पडतील परंतु मैदानात ते कमी पडणार नाहीत. मग अशा मुलांना न घेता नेभळट पोलिसांची भरती करुन काय साध्य केले जाणार आहे. सरकारच्या या कृतीचाही आमदार जयंतराव पाटील यांनी निषेध केला.


Most Popular News of this Week

राहुल शेवाळे यांच्या...

शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीने इयत्ता KG, Sr. KG व इयत्ता पहिलीमध्ये...

वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप...

'पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६' मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या...

शाळेच्या पहिल्या दिवशी...

जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित...

पिण्याच्या पाण्याच्या...

'अल नि‍नो'मुळे पावसाने ओढ दिल्‍याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा...

दिव्यांगांच्या सर्वांगीण...

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि...

जय पवार यांची मान्सूनच्या...

महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि...