हैडलाइन

राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा २८ जानेवारीपासून पश्चिम महाराष्ट्रात..

कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडयानंतर परिवर्तन यात्रा पश्चिम महाराष्ट्रात..
राष्ट्रवादीचा झंझावात सुरु...
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा दि. २८ जानेवारीपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली. २८ ते ३० जानेवारीपर्यंत ही निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा असणार आहे. कागल, मुधोळ, कोल्हापूर शहर, शिरोळ, कराड, रहिमतपूर, फलटण, पंढरपूर, अकलूज याठिकाणी जाहीर सभा होणार आहेत.
कोकणातील रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेवून आणि राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेत व महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून परिवर्तन यात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील बुलढाणा जिल्हयात आणि मराठवाडा याठिकाणी जाहीर सभा झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेतील जाहीर सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ही परिवर्तन यात्रा पश्चिम महाराष्ट्रात २८ जानेवारीला दाखल होणार आहे.
या परिवर्तन यात्रेत महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या कराड येथील समाधीस्थळी जावून अभिवादन केले जाणार आहे.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

अनुदानित गॅस सिलेंडर ९ वरून ४...

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत...

पालघर के शहीद संतों के...

पालघर में विगत वर्षों शहीद हुए संतों के परिजनों को आज तक कोई सरकारी मदद नहीं...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...