हैडलाइन

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला


मुंबई: मुंबई महानगरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱया ७ तलावांपैकी तानसा तलाव काल (दिनांक १४ जुलै २०२२) रात्री ८.५० वाजता ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाला एकूण ३८ दरवाजे आहेत, त्यापैकी रात्री ९.५० पर्यंत ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत.


परवा (दिनांक १३ जुलै २०२२) मोडक सागर जलाशय ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आज तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. म्हणजेच, यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी २ तलाव आता पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.    


तानसा तलावाचा विचार करता, गतवर्षी दिनांक २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता तर त्याआधीच्या वर्षी दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन हा तलाव वाहू लागला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. पैकी, तानसा तलावाची जलधारण क्षमता सुमारे १ लाख ४५ हजार ०८० दशलक्ष लीटर इतकी आहे.


Most Popular News of this Week

कोकण विभागीय माहिती...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अमोल महाजन यांनी आज विभागीय माहिती...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

वृक्षांना इजा पोहोचवणे आणि...

मुंबईतील वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल अबाधित राखण्यासाठी...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

सचिन अहिर यांच्या...

महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली...