हैडलाइन

चर्मकार विकास संघ मुंबई प्रदेश च्या शिष्टमंडळाने घेतली खासदार राहुल शेवाळे यांची भेट

चर्मकार विकास संघ मुंबई प्रदेश च्या शिष्टमंडळाने घेतली खासदार राहुल शेवाळे यांची भेट 


●ग्लोबल चक्र न्यूज 

मुंबई: चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजयजी खामकर यांच्या मार्गदर्शनाने मार्गदर्शिका नगरसेविका आशाताई सुभाष मराठे यांचे नेतृत्वाखाली मुंबई प्रदेशचे शिष्टमंडळ दक्षिण मध्य मुंबई लोकसभा खासदार राहुलजी शेवाळे यांची सदिच्छा भेट घेवुन चर्मकार समाजाच्या मागण्या विषयी सकारात्मक चर्चा केली. या प्रसंगी मुंबई, देवनार येथील लिडकॉम च्या जागेत संत रविदास महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे, तसेच चर्मकार विकास केंद्र करण्यात यावे,मुंबईत गटई कामगारांना पीच परवाना द्यावा, स्वयं रोजगारासाठी जाचक अटी रद्द करुन विनातारण, विना जामीनदार कर्ज उपलब्ध करून द्यावे इत्यादी मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. या वेळी वरील सर्व मागण्याचा सहानुभूती पूर्वक विचार करून शासन स्तरावर पाठपुराव्याने समाजाला न्याय मिळवून देईन असे आश्वासन खासदार राहुलजी शेवाळे यांनी दिले.

 या  शिष्टमंडळात राजेश साबळे (सहसचिव महाराष्ट्र), अशोक कांबळे (गटई कामगार अध्यक्ष), हंसराज रेगर (रेगर समाज अध्यक्ष),  चेतना कोरगावकर,  मीनाक्षी ताई सोनावणे ( जिल्हाध्यकक्षा उत्तर पश्चिम), प्रकाश चिमणकर (घाटकोपर तालुकाध्यक्ष), राजेंद्र ठोसर (तालुका सचिव),  राहुल कांबळे,  इत्यादी मान्यवरासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.



Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...