हैडलाइन

136 व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे उदघाटन संपन्न

136 व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे उदघाटन संपन्न 


●संध्या श्रीवास्तव 

मुंबई: श्रीधर भोसले यांनी मुंबईतील जीवन दर्शन चर्च मध्ये 27 मे रोजी आयोजित केलेल्या 136 व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे उदघाटन  मुंबईतील पत्रकार संरक्षण संघटनेच्या व माहिती अधिकार संघटनेच्या   सदस्या प्रीती प्रवीण भोसले यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी मार्गदर्शक म्हणून विक्रोळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशालिताई गावडे, डॉ. नीला अंतोनी पंडित व मुंबईतील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सिनिअर मॅनेजर बाळासाहेब विष्णू मोकळ उपस्थित होते. मार्गदर्शन करताना सर्वक मान्यवरांनी "मुलाला स्वतःचे घर पाहिजे" ही सातत्याने करत असलेली अपेक्षा मुलींच्या पालकांनी शिथिल करावी, विवाहानंतर नवविवाहितांनी स्वकष्टाने संसारिक प्रगती करावी असेही अवाहन करण्यात आले. मुंबईतील उपनगर,  नाशिक व नगर भागातील पालक व विवाहेच्छूक यावेळी उपस्थित होते. 

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले. हा सामाजिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विल्यम दिवे, सॅम्युएल जाधव, प्रफुल्ल देवकुळे, अनिता सुधीर दिवे इत्यादींनी परिश्रम घेतले.



Most Popular News of this Week

वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप...

'पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६' मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या...

राहुल शेवाळे यांच्या...

शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीने इयत्ता KG, Sr. KG व इयत्ता पहिलीमध्ये...

शाळेच्या पहिल्या दिवशी...

जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित...

पिण्याच्या पाण्याच्या...

'अल नि‍नो'मुळे पावसाने ओढ दिल्‍याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा...

दिव्यांगांच्या सर्वांगीण...

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि...

जय पवार यांची मान्सूनच्या...

महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि...