हैडलाइन

मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला मुंबईतील विविध कामांचा बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात घेतला आढावा

मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला मुंबईतील विविध कामांचा बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात घेतला आढावा


●ग्लोबल चक्र न्यूज डेस्क 

मुंबई: मुंबईतील विविध कामांचा राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक ८ नोव्हेंबर २०२३) आढावा घेतला. सर्व कामांचे व्यवस्थित नियोजन करून कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश श्री.केसरकर यांनी यावेळी दिले.

या बैठकीला विविध सह आयुक्त / उप आयुक्त, सहायक आयुक्त, खातेप्रमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

मैदान किंवा उद्यानाच्या जागांवर दिल्ली मार्केटच्या धर्तीवर फेरीवाल्यांसाठी मार्केट उभारणे; कुलाबा परिसरात हातगाडीने होणाऱ्या मालवाहतुकीचे आधुनिकीकरण करणे; मुंबईतील रस्त्यांची सिमेंट क्रॉंकिटीकरण, मुंबईतील उड्डाणपूल; आपला दवाखाना- बीपीटी-बीएमसीकडून संयुक्त उपक्रम राबविणे; मुंबईतील विविध वस्ती व घरगल्ली स्वच्छता उपक्रम; माहीम रेतीबंदर ते दादर चौपाटी येथील समुद्रकिनारी सी-साईड वॉक वे तयार करणे; वरळी सी-फेस येथील इमारतीवर लाईट्स आणि लेझरद्वारे रोशणाई करून सुशोभीकरण; छत्रपती शिवाजी पार्क मैदान (शिवाजीपार्क) परिसरामध्ये प्रोजेक्शन मॅपिंग, रोशणाई व सुशोभीकरण; मुंबईतील वाढते प्रदूषण आणि त्या अनुषंगाने विविध उपाययोजना; महानगरपालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे, महानगरपालिकेतील सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेतील सेवा जोडून उचित लाभ देणे; शाळांच्या इमारती दुरुस्ती आणि सुशोभीकरण, टेरेस गार्डनची निर्मिती; मफतलाल येथील भूखंडाखाली भूमिगत मत्स्यालय बांधण्याबाबत संभाव्यता तपासणे; मुंबई किनारी रस्ता-उद्यान विकसित करणे, मालमत्ता स्थलांतर प्रकरणे निकाली काढणे; पुनर्विकास अंतर्गत विविध प्रकल्पांची माहिती व बाधितांच्या प्रश्नांबाबत चर्चा; लोअर परळ पुलाखाली विशेष बाब म्हणून स्टॉल उभारणी; मुंबईतील भाजी मंडई, मटण मार्केट, चिकन मार्केट दुरुस्तीबाबत कार्यवाही करणे; झोपडपट्टी वसाहतीत शौचालयांची पुनर्बांधणी, घनकचरा वर्गीकरण आणि स्वच्छता अभियान राबविणे, स्वच्छता कर्मचारी आश्रय योजनेची सद्यस्थिती,  समुद्र किनाऱ्याची स्वच्छता; प्रमुख रुग्णालयांमध्ये डायलिसिस केंद्र सुरू करणे; जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे विहित वेळेत वितरित करणे; वरळी कोळीवाडा, माहीम कोळीवाडा, कफ परेडबाबत चर्चा तसेच वरळी कोळीवाडा प्रस्तावित पर्यटन प्रकल्प; ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र उभारणे; महिलांसाठी सुविधा केंद्र उभारणे; बेस्टच्या जुन्या बसेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा करणे; बेघर होमबद्दलचे धोरण व व्यवस्था करणे; रात्र निवासाबाबत नियोजन आणि बीपीटीसोबत समन्वय; प्रत्येक दलित वस्तीजवळ ग्रंथालय आणि रिडींग कंटेनर करणे; महिलांसाठी पिंक टॉयलेट उभारणे; बायो टॉयलेट उभारणे; फॅशन स्ट्रीट सुधारणा करणे, महालक्ष्मी मंदिर परिसर, मुंबादेवी मंदिर परिसर, हाजीअली दर्गा परिसर; पारशी अग्यारी, माहीम चर्च परिसर, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर विकास आराखडा;  जगन्नाथ शेठ, भागोजी शेठ कीर यांचे स्मारक उभारणे; दिव्यांग नागरिकांना महानगरपालिका आणि बेस्टकडून विविध सुविधा पुरविणे यांच्याशी संबंधित कामांची सद्यस्थिती या बैठकीमध्ये पालकमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी जाणून घेतली तसेच सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश प्रशासनाला दिले.



Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...

मुंबईकरांनी पाण्याचा...

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी...

नालेसफाईच्या नावावर...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई...