हैडलाइन

खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक

खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक

मुंबई: शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता मानखुर्द येथील राहत्या घरी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्या घरीच होत्या. मात्र, रविवारी सायंकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना चेंबूरच्या साई रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्युसमयी त्या 73 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात अविनाश शेवाळे, नवीन शेवाळे आणि खासदार राहुल शेवाळे अशी 3 मुले, सौ. वर्षा अविनाश  शेवाळे, माजी नगरसेविका सौ. वैशाली नवीन शेवाळे, माजी नगरसेविका सौ. कामिनी राहुल शेवाळे या 3 सूना आणि एकूण 6 नातवंडे असा परिवार आहे. 


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...