हैडलाइन

सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये केशरी व पिवळ्या रेशनकार्ड धारकांनी उपचाराचा लाभ घ्यावा -राजेश शर्मा

सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये केशरी व पिवळ्या रेशनकार्ड धारकांनी उपचाराचा लाभ घ्यावा

-राजेश शर्मा


●ग्लोबल चक्र न्यूज डेस्क 

मुंबई: सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये केशरी व पिवळ्या रेशन कार्डधारकांना उपचाराची सुविधा दिली जाते व ४० ICU बेड्स उपचारासाठी ताब्यात घेतले आहेत असे  महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे. मुंबईतील जोगेश्वरी, अंधेरी व आसपासच्या लोकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी केईएम व इतर दुरच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याऐवजी अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल्समध्येच जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन मुंबईचे माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केला आहे.

 यासंदर्भात राजेश शर्मा पुढे म्हणाले की, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये १५०० बेड्सची क्षमता आहे पण सध्या हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरु नाही, त्याचा फटका मुंबईकरांना बसत आहे. हे हॉस्पिटल महानगरपालिकेने ताब्यात घेऊन केईए, नायर, सायन हॉस्पिटल प्रमाणे चालवले तर लाखो मुंबईकरांना वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येईल. या हॉस्पिटलमध्ये सध्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्याचा जास्तीत जास्त मुंबईकरांनी लाभ घ्य़ावा.  सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेऊन पूर्ण क्षमतेने सुरु करावे अशी वारंवार मागणी केली जात असतानाही मुंबई महानगरपालिका त्याकडे गांभिर्याने पहात नाही, चालढकल करत आहे. आतातरी मुंबई महानगरपालिकेने तातडीने हालचाल करुन सेव्हन हिल्स हॉस्पिटल ताब्यात घ्यावे व पूर्ण क्षमतेने चालवावे ज्याचा मुंबईकरांना फायदाच होईल.


Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या...

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. भाजपा...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सूखे को लेकर केंद्र सरकार से...

महाराष्ट्र में भीषण सूखे की स्थिति को लेकर शिवसेना के मुख्य नेता और राज्य...

विद्याविहार रेल्वे...

घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील...