हैडलाइन

मुलुंडमध्ये जिल्हा क्रीडा संकुल उभारणार - 7510 चौरस मीटरचे दोन भूखंड राज्याच्या क्रीडा विभागाने संपादित केले

मुलुंडमध्ये जिल्हा क्रीडा संकुल उभारणार


- 7510 चौरस मीटरचे दोन भूखंड राज्याच्या क्रीडा विभागाने संपादित केले

- भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी या प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची केली मागणी

- प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्यासाठी मी राज्य सरकारकडे जोरकसपणे पाठपुरावा करेन


मुंबई: ईशान्य मुंबईतील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी, मुलुंड (पूर्व) येथे 7510 चौरस मीटरच्या दोन भूखंडांवर जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. राज्याच्या क्रीडा विभागाने जिल्हा क्रीडा संकुलासाठी दोन्ही भूखंड ताब्यात घेतले आहेत.


मुलुंडचे आमदार आणि मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी मुलुंडमधील जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रस्ताव दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून ते महसूल, क्रीडा विभाग आदी विविध सरकारी विभागांकडे पाठपुरावा करत आहेत.


कोविड काळात कोटेचा यांनी मुलुंडमधील या प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलातील कोणकोणत्या सुविधा असाव्यात यासाठी लोकांकडून सूचना मागविल्या. त्यांच्या आवाहनाला मोठ्या संख्येने लोकांनी प्रतिसाद देत जिल्हा क्रीडा संकुलासाठी मोलाच्या सूचना दिल्या. “जनतेकडून प्राप्त सूचनांच्या आधारे  मी जिल्हा क्रीडा संकुलासाठी स्विमिंग पूल, इनडोअर बॅडमिंटन कोर्ट, इनडोअर टेबल टेनिस, तिरंदाजी, जिम्नॅस्टिक्स आणि एरोबॅटिक्ससाठी सॉफ्ट फ्लोअरिंग, जिम्नॅशियम, कॅरम, व्हॉलीबॉल कोर्ट आणि बास्केटबॉल कोर्ट यासारख्या सुविधांची मागणी केली आहे, असे कोटेचा म्हणाले. 


कोटेचा पुढे म्हणाले की, जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी शासनाकडे 100 कोटी रुपयांची मागणी केली आहे. “माझ्या अथक प्रयत्नानंतर ही जागा क्रीडा विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. आता हा प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलासाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत मी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत राहीन, असेही ते म्हणाले.


जिल्हा क्रीडा संकुलामागील भूमिका विषद करताना कोटेचा म्हणाले की आमचे आदरणीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी भारतात युवा ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिकचे आयोजन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचा त्यांचा निर्धार आहे. मुलुंड येथील जिल्हा क्रीडा संकुल हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. त्याचा फायदा ईशान्य मुंबईसह मुंबईतील खेळाडूंना होईल.




Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या...

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. भाजपा...

सूखे को लेकर केंद्र सरकार से...

महाराष्ट्र में भीषण सूखे की स्थिति को लेकर शिवसेना के मुख्य नेता और राज्य...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...