हैडलाइन

काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक मो आरिफ (नसीम) खान यांच्या हस्ते वर्षा गायकवाड यांच्या चांदिवली मतदार संघातील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन संपन्न


काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक मो आरिफ (नसीम) खान यांच्या हस्ते  वर्षा गायकवाड यांच्या चांदिवली मतदार संघातील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन संपन्न



मुंबई: महाविकास आघाडीचे उत्तर मध्य मुंबईचे लोकसभेचे काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या चांदिवली मतदार संघातील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन  माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष तसेच व काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक मो आरिफ (नसीम) खान यांच्या हस्ते झाले.


 उद्घाटन प्रसंगी उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यासहित गुजरात राज्याचे विरोधी पक्ष नेता परेश धनानी, चांदिवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष बाबू बत्तेली, तालुका अध्यक्ष अबू सालेहा शिवसेना (उबाठा गट) चे एस. अण्णामलाई, शाखाप्रमुख साईनाथ कटके यांच्यासह स्थानिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 


निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर संध्याकाळी  काळा किल्ला, संदेश नगर, बैलबाजार येथून टिळक नगर गेट अंधेरी घाटकोपर लिंक रोड पर्यंत पदयात्रा काढण्यात आली.


त्यानंतर   लकी हॉटेल खैरनी रोड आणि रात्री  संदेश नगर, काळा किल्ला, बैलबाजार, कुर्ला येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.


लकी हॉटेल येथे आयोजित सभेत अखिल भारतीय काँग्रेस सचिव बी. एम. संदीप तर बैलबाजार, संदेश नगर येथील सभेत विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.


वरील सर्व कार्यक्रमात हजारोच्या संख्येने महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हर्षोल्हासात सहभाग घेतला.




Most Popular News of this Week