हैडलाइन

नवी मुंबई पालिकेवर भगवा फडकवूया - विजय नाहटा


नवी मुंबई पालिकेवर भगवा फडकवूया - विजय नाहटा 

नवी मुंबई :- मागील काळात लोकहिताचे धाडशी  निर्णय तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले. दुसऱ्यांदा राज्याची सत्ता  महायुतीकडे येण्यात शिंदे यांचा सिहाचा वाटा होता .जनतेची नाळ ओळखून आक्रमकपणे  काम करणारे नेतृत्व आपणास लाभले आहे. राज्यभर शिवसेना जोमाने वाढत आहे. शिवसैनिकांनी सर्वसामान्य  जनतेत मिसळून  प्रश्न सोडवावेत त्यांच्याशी समरस व्हावे असे आवाहन शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी वाशी येथे बोलताना केले.शिवसैनिकांनी जनसामान्यात आपली प्रतिमा लढवय्ये अशी  निर्माण करा, शिवसेना  कार्यकर्त्यांच्या जीवावर  उभी असून शिवसैनिक ही ऊर्जा आहे.आगामी काळात एकदिलाने काम करत येणाऱ्या नवी मुंबई मनपा निवडणुकीत भगवा फडकवूया असा निर्धार ही नाहटा यांनी शिवसैनिकांसमोर  बोलताना व्यक्त केला.
       शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे  उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे 
 यांच्या उपस्थितीत  विजय नाहटा  यांचा  नुकताच शिवसेना पक्षात पुनरप्रवेश  झाला आहे. त्या निमित्त नवी मुंबईतील शिवसेना कार्यकर्त्यांनी  नाहटा यांना  शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे मार्गदर्शन लाभण्यासाठी  एका बैठकीचे आयोजन  सोमवार, 7 एप्रिल  रोजी  वाशी येथील श्री  बालाजी मंदिर सभागृहात   केले होते . यावेळी व्यासपीठावर नवी मुंबई जिल्हा प्रमुख  किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, महिला जिल्हा संघटक सरोजताई पाटील , उपजिल्हा प्रमुख गणपत शेलार, रोहिदास पाटील, दिलीप घोडेकर, नवी मुंबई 
शहर प्रमुख विजय माने  आदि मान्यवर उपस्थित होते. 
     
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  माजी नगरसेवक रामाशेठ वाघमारे, कामगार सेना प्रमुख प्रदिप वाघमारे,
उत्तर भारतीय जिल्हा संघटक कमलेश वर्मी,   मिलिंद सूर्यराव,  गिरीधरीलाल गुप्ता, कमल शुक्ला, संतोष दळवी, महेश कुलकर्णी, संजय भोसले, यासह आजी- माजी नगरसेवक, नगरसेविका, युवा सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
-----------------------------------------------
  शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवित  पक्ष बांधणी मजबूत करू  - किशोर पाटकर 

 स्थानिक खासदार नरेश म्हस्के  यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जोमाने कार्यरत आहे.   नवी मुंबईतील प्रश्नांची आणि समस्याची जाण असणारे आणि प्रशासकीय दांडगा अनुभव असणारे, अभ्यासू नेतृत्व शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचे  मार्गदर्शन आणि साथ  आपणास मिळणार  आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. पक्ष बांधणी करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबवित संघटनात्मक बांधणी मजबूत  करू. जनसामान्य लोकात मिसळून जो काम करेल त्यालाच पद आणि  आगामी  मनपा निवडणुकीत प्राधान्याने संधी  देण्यात येईल.
किशोर पाटकर
जिल्हा प्रमुख,
 नवी मुंबई 
   ------------------------------------



Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...