हैडलाइन

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष!



ऐतिहासिक ६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर

स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते होणार

महाराष्ट्रातील जलतरणपटू सज्ज

मुंबई (क्री. प्र.) : अथांग अरबी समुद्राच्या निळ्याशार लाटांवर जलतरणपटूंच्या जिद्दीचा आणि साहसाचा थरार अनुभवण्याची वेळ आली असून, प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ‘६२ वी संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिमाखात पार पडणार आहे. मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात रंगणाऱ्या या महास्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते होणार आहे. जलतरणपटूंच्या जिद्दीला आणि समुद्राच्या लाटांना आव्हान देणारी ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून धाडस, चिकाटी आणि कौशल्याचा उत्सव ठरणार आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरात होणाऱ्या या महास्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जलतरणप्रेमींचे लक्ष लागले असून, शेकडो खेळाडू समुद्राच्या लाटांवर आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत.


Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या...

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. भाजपा...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सूखे को लेकर केंद्र सरकार से...

महाराष्ट्र में भीषण सूखे की स्थिति को लेकर शिवसेना के मुख्य नेता और राज्य...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...