हैडलाइन

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली घोषणा

मुंबई, ता. 2 : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी 7 वी, 17 वर्षांखालील (अंडर 17)  ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा येत्या 5 एप्रिल ते 11 एप्रिल 2026 दरम्यान नागपूर येथे पार पडणाऱ्या स्पर्धेची अधिकृत घोषणा, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष,शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केली. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात गुरुवारी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष रणजीत सावरकर यांनी देखील संघटनेची भूमिका मांडली.

नागपूर येथे पार पडणाऱ्या या स्पर्धेत देशभरातून निवड झालेल्या युवा खेळाडूंना  आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याची मोठी संधी मिळणार आहे.या प्रतिष्ठित स्पर्धेत तब्बल 250 महिला खेळाडू आणि 350 पुरुष खेळाडू सहभागी होणार असून, एकूण 600 हून अधिक बॉक्सर्स यावेळी रिंगमध्ये उतरतील. त्यांच्यासोबत 180 प्रशिक्षक व टीम मॅनेजर्स, तसेच संघटनेच्या वतीने 70 अधिकृत कर्मचारी सहभागी होणार आहेत. 

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राहुल शेवाळे म्हणाले की, कंपनी ऍक्टनुसार तयार झालेल्या आमच्या संघटनेला बीएफआय (बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया) ने मान्यता दिल्यामुळे कोणत्याही वादाचा प्रश्नच नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांना पाठिंबा देण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या बॉक्सिंगपटूंच्या भविष्यासाठी सर्व जिल्हा संघटनांच्या सहकार्याने मी या क्षेत्रात प्रवेश केला आहे 

संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष रणजीत सावरकर यांनी सांगितले की, "नोव्हेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने रद्दबातल ठरवली होती. त्यानंतर, तांत्रिकदृष्ट्या कोणतीही संघटना राज्य पातळीवर कार्यरत नसल्याने खेळाडूंचे मोठे नुकसान होत होते. यासाठीच आम्ही कंपनी ऍक्ट अंतर्गत एक नवीन संघटना स्थापन करून बीएफआयच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत मुंबईत या संघटनेची निवडणूक घेतली आणि या अध्यक्षांसह 13 पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड यावेळी करण्यात आली. यानंतर आमच्या संघटनेला बीएफआयने मान्यता दिली"

*राहुल शेवाळेंचं प्रवीण दरेकरांना निमंत्रण*

"आमदार प्रवीण दरेकर हे माझे चांगले मित्र आहेत.बॉक्सिंग क्षेत्रात कोणताही राजकीय वाद नसून 5 एप्रिलला सुरू होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया. या स्पर्धेसाठी मी प्रवीण दरेकर यांनाही निमंत्रित करतो" अशा शब्दांत राहुल शेवाळे यांनी दरेकरांना वादावर पडदा टाकण्याचे आवाहन केले. तसेच, माझ्या राजकीय भवितव्याची काळजी घेण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब समर्थ आहेत. त्यामुळे माझ्या राजकीय भवितव्याची काळजी तुम्ही करू नका, असा टोलाही त्यांनी दरेकरांना लगावला.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...