हैडलाइन

क्रिकेटच्या मैदानावर महापौरांचा दमदार अंदाज; चेंबूरमध्ये ग्लोबल मीडिया फाऊंडेशनची क्रिकेट स्पर्धा रंगली जोरदार

पत्रकार सतत २४ तास लोकांपर्यंत बातम्या पोहोचवण्यासाठी झटत असतात. त्यांच्या व्यस्त जीवनात थोडासा विरंगुळा आणि मनोरंजन मिळावा, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी ग्लोबल मीडिया फाऊंडेशन यांच्या वतीने चेंबूर येथील जवाहर विद्या भवन मैदानावर “मीडिया क्रिकेट चॅम्पियनशिप”चे आयोजन करण्यात आले.


या स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या महापौर रितु तावडे यांनी आपल्या क्रिकेटप्रेमाची झलक सर्वांना दाखवली. त्यांनी आमदार सना मलिक शेख यांच्या सोबत स्वतः टर्फ पीचवर उतरून फलंदाजी आणि गोलंदाजी करत खेळाचा आनंद घेतला. यावेळी उपस्थितांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.


स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘लोकशाही’ आणि ‘टीव्हीजेए’ या संघांमध्ये तुफानी लढत झाली. या सामन्यात टीव्हीजेए संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.


या टूर्नामेंटचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते सुबोध आचार्य आणि नगरसेविका अंजली नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय प्रभाग समिती अध्यक्षा आशा मराठे, माजी नगरसेवक किशन मिस्त्री, ग्लोबल इंडियन फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर मन्याल यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.




ही क्रिकेट स्पर्धा पत्रकारांसाठी एक वेगळा अनुभव ठरली असून, कामाच्या धावपळीतून थोडा वेळ काढून खेळाचा आनंद लुटण्याची संधी या निमित्ताने सर्वांना मिळाली.



Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

मध्य रेल्वेच्या भोंगळ...

मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा आणि विस्कळीत वेळापत्रकाचा फटका सोमवारी...