हैडलाइन

पवई येथील फुकट नगर आणि मिलिंद नगर परिसरातील सुमारे २५० अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई

पवई येथील फुकट नगर आणि मिलिंद नगर परिसरात असलेल्या जल अभियंता विभागाच्या जागेवरील सुमारे २५० अनधिकृत बांधकामांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) आणि जल अभियंता विभागामार्फत संयुक्तपणे निष्कासनाची कारवाई करण्यात आली. उपायुक्त (परिमंडळ ६) यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त'एस' नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. 

सदर परिसरात शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई हाती घेण्यात आली. संबंधित जागा अतिक्रमणमुक्त करून तिचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या कारवाईसाठी सुमारे १५० पोलीस कर्मचारी, ‘एस’ विभाग आणि जल अभियंता विभागातील सुमारे ५० अभियांत्रिकी अधिकारी व कर्मचारी, २०० मजूर तैनात होते. तसेच ७ जेसीबी, १० डंपर आणि इतर लहान मालवाहू वाहनांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान अनधिकृत बांधकामे हटवून जागा पूर्णपणे मोकळी करण्यात येत आहे. अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित जागेभोवती कुंपण उभारण्याचे कामदेखील तातडीने हाती घेण्यात येणार असून, पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

दरम्यान, शासकीय व महानगरपालिका मालकीच्या जागांवरील अतिक्रमणांविरोधातील कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...

मुंबईकरांनी पाण्याचा...

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी...

नालेसफाईच्या नावावर...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई...