हैडलाइन

आषाढी वारीत संघर्षाची कहाणी ऐकून आदेश बांदेकर झाले भावूक; विधवा महिलेला केली आर्थिक मदत

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेते आदेश बांदेकर यांनी वारकऱ्यांसोबत पंढरपूरची वारी केली. अकलूज येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होणार असल्याने परिसरात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. त्यापैकी "भारतीय नारी सब पे भारी" या संकल्पनेवर आधारित रांगोळी विशेष चर्चेत होती. ही रांगोळी जुन्नर येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार पूजा काळे यांनी साकारली होती. त्यांच्या नावावर रांगोळी कलेतील पाच विश्वविक्रम असून, यंदाच्या वारीत आणखी दोन विश्वविक्रमांची नोंद झाली.

रांगोळी पाहिल्यानंतर आदेश बांदेकर यांनी पूजा काळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी पूजाने तिची सहकारी सुवर्णा घारे हिची ओळख करून देताना, "संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर ती माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली. माझ्या प्रत्येक विश्वविक्रमाच्या वेळी तिची साथ होती," असे सांगितले.

यानंतर सुवर्णा घारे यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी समोर आली. लग्नानंतर अवघ्या एका वर्षातच पतीचे निधन झाले. पदरी चार वर्षांचे लेकरू आणि संसाराची जबाबदारी असतानाही त्यांनी हार न मानता आयुष्याशी झुंज देत पुढे वाटचाल सुरू ठेवली.

सुवर्णा यांचा हा संघर्ष ऐकून आदेश बांदेकर भावूक झाले. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी त्यांना आर्थिक मदत केली आणि पुढील आयुष्यासाठी धीर व शुभेच्छा दिल्या.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...