हैडलाइन

चेंबूरमध्ये खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे मुंडन आंदोलन

मुंबईच्या चेंबूरमध्ये काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे यांच्या अपमानाच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आलं.
काँग्रेसचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली हे मुंडन आंदोलन करण्यात आलं. हंडोरे यांच्यासह काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी डोक्याचे केस काढून घेत निषेध व्यक्त केला.

या आंदोलनाच्या केंद्रस्थानी उत्तराखंडमधील एका कार्यक्रमानंतर निर्माण झालेलं ‘स्टेज शुद्धीकरण’ प्रकरण आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या आरोपानुसार, ते कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्यानंतर त्या मंचाचं कथितरित्या शुद्धीकरण करण्यात आलं. या घटनेमुळे खरगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हा केवळ आपला नव्हे तर सामाजिक समतेच्या मूल्यांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.

या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. चेंबूरमध्ये झालेल्या मुंडन आंदोलनातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला.

दरम्यान, या प्रकरणावर राज्यसभेतही चर्चा झाली. राज्यसभा सभापतींनी खरगे यांचा अपमान हा सर्वांचाच अपमान असल्याचं म्हटलं, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे.

मात्र, आता खरगे यांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून चेंबूरमध्ये करण्यात आलेल्या या मुंडन आंदोलनामुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. काँग्रेसच्या या आंदोलनातून संबंधित घटनेचा निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली असून, या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...