हैडलाइन

नगरच्या 18 नगरसेवकांवर राष्ट्रवादीची बडतर्फीची कारवाई, जिल्हाध्यक्षांना पदावरून काढून टाकले...

मुंबई:  अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये पक्षादेश डावलून भाजपाला मतदान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे तर जिल्हाध्यक्षांना अध्यक्षपदावर काढून टाकण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षाने कॉग्रेस पक्षाला मतदान करण्याचा आदेश असताना तो डावळण्यात आला. त्यानंतर पक्षाच्यावतीने त्यांना सात दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडण्याची संधी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटीसीद्वारे देिली होती परंतु यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षाच्यावतीने कारवाई करण्यात आली तर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी अशा प्रकारच्या पक्षविरोधी कारवाई होत असताना पक्षश्रेष्ठींना कोणती कल्पना दिली नाही किंवा घडलेल्या घटनेबाबत कोणताही खुलासा केला नसल्याने जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या कारवाईत म्हटले आहे.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...