हैडलाइन

नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना एकटे सोडू नका;त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घ्या - सुनेत्रा पवार

राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी पक्षातील सर्व मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी करण्याचे स्पष्ट व सक्त निर्देश दिले आहेत.

नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना एकटे सोडू नका. त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घ्या, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करा आणि आवश्यक प्रशासकीय मदत मिळवून देण्यासाठी तत्परतेने पाठपुरावा करा, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी आज दिल्या.

शेतकरी अडचणीत असताना आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐका, त्यांना धीर द्या आणि शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असे स्पष्ट निर्देशही दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ता हा शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासोबत आहे, हा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्याचे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...