हैडलाइन

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व महापौर रितू तावडे यांनी घेतले खा. संजय दिना पाटील यांच्या गणरायांचे दर्शन

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व महापौर रितू तावडे यांनी घेतले खा. संजय दिना पाटील यांच्या गणरायांचे दर्शन

भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडुप पश्चिम येथील निवासस्थानी आज भेट देऊन गणरायांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी खासदार राजोल संजय पाटील यांनी सचिन अहिर यांचे स्वागत केले. याच भक्तिपूर्ण वातावरणात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन घेतले. गणरायाच्या चरणी नतमस्तक होत मान्यवरांनी बाप्पांचे आशीर्वाद घेतले.

दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीदेखील काल रात्री ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडुप पश्चिम येथील निवासस्थानी आगमन करून गणरायांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी खासदार संजय दिना पाटील व त्यांची ज्येष्ठ कन्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी महापौर रितू तावडे यांचे स्वागत केले. याप्रसंगी नगरसेविका जागृती पाटील यांचीही उपस्थिती होती.

खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानी गणरायांचे आगमन झाल्यापासून भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून बाप्पांच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली जात आहे. सचिन अहिर, रवींद्र चव्हाण आणि महापौर रितू तावडे यांच्या गणराय दर्शनामुळे या भक्तिपूर्ण सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. बाप्पांच्या चरणी श्रद्धा अर्पण करत मान्यवरांनी सुख, समृद्धी आणि मंगलमय आशीर्वादाची प्रार्थना केली. त्यांच्या उपस्थितीमुळे खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानी भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण अधिकच खुलून आले.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...