मुंबई,: - भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त चेंबूरच्या आंबेडकर उद्यान येथे अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम अनुयायीना
जॉईंट जर्नालिस्ट एक्शन कमिटी च्या अधिपत्याखाली पत्रकार संघटनेतर्फे मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. शिव वाहतूक सेनेचे माजी अध्यक्ष दीपक महेश्वरी यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझर वाटपाची सुरुवात झाली. दरम्यान डॉ बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस पत्रकार संघटनेच्या प्रतिनिधींनी महामानवास अभिवादन करून आदरांजली वाहिली.