हैडलाइन

राहुल शेवाळे यांना प्रभू श्रीरामाचा आयोध्येतून खास आशीर्वाद अयोध्येतील संतांनी सुपूर्द केला अभिमंत्रित केला धनुष्यबाण

राहुल शेवाळे यांना प्रभू श्रीरामाचा आयोध्येतून खास आशीर्वाद

अयोध्येतील संतांनी सुपूर्द केला अभिमंत्रित केला धनुष्यबाण

श्रीराम मंदिरातील दर्शनादरम्यान मिळाला आशीर्वाद

संत महंतांच्या आशीर्वादाने राहुल शेवाळे भावूक



अयोध्या:  रामनवमीच्या पूर्वसंध्येला महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना थेट आयोध्येतून प्रभू श्रीरामचंद्राचा खास आशीर्वाद मिळाला आहे.  श्री राम मंदिराच्या गर्भगृहात अभिमंत्रित केलेला पवित्र धनुष्यबाण अयोध्येतील संतांच्या वतीने राहुल शेवाळे यांना सुपूर्द करण्यात आले. येथील तपस्वी छावनी पीठाधिश्वर जगद्गुरु परमहंस आचारी महाराजांच्या निमंत्रणावरून राहुल शेवाळे हे मंगळवारी सायंकाळी अयोध्येत दाखल झाले होते. प्रभू श्री रामाच्या दर्शनाच्या वेळी आगामी निवडणुकींच्या विजयासाठी आशीर्वाद देत 

संतांनी हा धनुष्यबाण त्यांना सुपूर्द केला.


अयोध्येतील जगद्गुरु परमहंस आचारी महाराजांनी राहुल शेवाळे यांना रामनवमी निमित्त अयोध्येत दर्शनासाठी निमंत्रित केले होते. या निमंत्रणाचा स्वीकार करून दक्षिण मध्य मुंबईतील सिध्दीविनायक, वडाळ्यातील राम मंदिर यांसारख्या प्रमुख मंदिरातील मोजक्या मान्यवरांसह राहुल शेवाळे अयोध्येत रवाना झाले. मंगवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान राहुल शेवाळे अयोध्येतील राम मंदिरात दाखल झाले. यावेळी श्रीरामाचे आशीर्वाद घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी प्रार्थना केली. या प्रार्थने दरम्यान इथल्या संतांच्या वतीने राहुल शेवाळे यांना मंदिरात अभिमंत्रित केलेला धनुष्यबाण देण्यात आला. 



प्रभू श्रीरामाने दिला धनुष्यबाण -राहुल रमेश शेवाळे

आयोध्येतील राम मंदिरांच्या गर्भगृहात अभिमंत्रित केलेला हा धनुष्यबाण म्हणजे प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्राचा आशीर्वाद आहे. इथल्या संतांनी विजयी भव म्हणत दिलेला हा धनुष्यबाण आदरपूर्वक मुंबईत नेऊ. अयोध्येत भव्य प्रभू श्रीराम मंदिर व्हावे, ही वंदनीय  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी आहे. त्यामुळे या धनुष्याबाणासह बुधवारी शिवाजी पार्क येथल्या स्मृती  स्थळावर जाऊन वंदनीय बाळासाहेबांचा आशीर्वाद घेणार!







Most Popular News of this Week

राहुल शेवाळे यांच्या...

शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीने इयत्ता KG, Sr. KG व इयत्ता पहिलीमध्ये...

वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप...

'पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६' मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या...

शाळेच्या पहिल्या दिवशी...

जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित...

पिण्याच्या पाण्याच्या...

'अल नि‍नो'मुळे पावसाने ओढ दिल्‍याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा...

दिव्यांगांच्या सर्वांगीण...

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि...

जय पवार यांची मान्सूनच्या...

महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि...