चेंबूर जिमखाना, चेंबूर, मुंबई येथे झालेल्या बँक ऑफ बरोडा पुरस्कृत तिसरी ऑल इंडिया ओपन फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा २०२५ दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आली.
विजेत्या खेळाडूंना चेंबूर जिमखानाचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण वधावन, सल्लागार श्री सुरींदर शर्मा, क्रीडा सचिव श्री मनीष शर्मा, बुद्धिबळ विभागाचे सचिव श्री बाळकृष्ण परब, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजा बाबू गजेंगी यांच्या हस्ते रोख पारितोषिके चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री बाळकृष्ण परब यांनी नमूद केले की या स्पर्धेत देशभरातून 491 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. ४ आंतरराष्ट्रीय मास्टर्स सहभागी झाले. प्रसिद्ध lM खेळाडू श्री. सागर शहा यांच्या सहभागामुळे सर्व लहान मोठ्या खेळाडूंमध्ये उत्साही वातावरण होते.
स्पर्धा संचालक गजेंगी राजाबाबू यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांचा विजेता अनिरुद्ध पोटवड ह्याने ही स्पर्धा जिंकून हॅट्रिक साजरी केली.
ह्याप्रसंगी चेंबूर जिमखान्यातर्फे स्पर्धकांच्या पालकांची सर्व प्रकारे व्यवस्थित सोय करण्यात आली होती.