हैडलाइन

खा. संजय दिना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन परिसराची पाहणी

भांडुप पश्चिम स्टेशन रोडवर अनेक समस्या उद्भवत असून प्रवाशांना चालण्यासाठी सुटसुटीत रस्ता मिळत नसल्याने त्यांना रिक्षा व बस पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच स्टेशन परिसरात होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करता यावी, यासाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शिवसेनेचे नगरसेवक, पालिकेच्या एस विभागातील अधिकारी तसेच बेस्ट बस व वाहतुक विभागाचे अधिकारी व रिक्षा युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.


भांडुप पश्चिम येथील स्टेशन रोडवर झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात चारजणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. त्यामुळे प्रवाशी आणि बस चालकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र स्टेशन रोडवर असलेल्या पोलीस आणि बेस्ट बसच्या चौकींमुळे रस्ता निमुळता होत असल्याने प्रवाशांना बस व रिक्षा पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच कामावर जाताना येताना या परिसरात दाट गर्दी होत असल्याने पादचा-यांना या गर्दीतून मार्ग काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यातुन मार्ग काढण्यासाठी खासदार संजय दिना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी त्यांच्या भांडुप येथील कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख रमेश कोरगावकर,  नगरेसेविका दिपमाला बढे, राजोल संजय पाटील, सुरेश शिंदे तसेच पालिकेच्या एस विभागाच्या सहाय्यक आयुक्त समरिन सय्यद, वाहतुक विभागाचे पोलीस निऱिक्षक तांबे, बेस्ट बसचे सहाय्यक आयुक्त प्रशांत ठोंबरे व रिक्षा युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भांडुप स्टेशन परिसरात असलेल्या पोलीस व बेस्ट बसच्या दोन्ही चौक्या काढण्याबाबत एक मत झाले. तसेच स्टेशन परिसरात असलेल्या दुकानांना स्थलांतरीत करावे किंवा त्यांना दोनशे फुट मागे जागा देण्याबाबत खा. संजय दिना पाटील यांनी प्रस्ताव दिला असून याबाबत ते केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करुन त्यांना पत्र देणार आहेत. तसेच बेस्टच्या बसेस सध्या आकाराने मोठ्या असल्याने त्यांना वळन घेता येत नाही. त्यामुळे या भागात लहान आकाराच्या बसेस देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बस डेपो स्टेशन परिसरात असलेल्या पार्किंगच्या जागेत किंवा ड्रिम्स मॉलच्या जागेत स्थलांतरीत करण्यासंदर्भात खासदारांनी सुचविले.


रिक्षा चालकांनी रांगेतच प्रवाशांना घेण्यासंदर्भात सुचना करण्यात आल्या. भाडे नाकारणे, रांग तोडून प्रवाशांना घेणे तसेच तीन पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जाणा-या रिक्षा चालकांवर दंडात्मक होणा-या कारवाईला रिक्षा चालकांनी यावेळी विरोध केला. नागरीकांनी ही रांगेतच येऊन रिक्षा व बस पकडावी. तसेच शेअरिंग रिक्षासाठी रिक्षा स्टँड देण्याबाबत रिक्षा युनियनकडून मागणी करण्यात आली. या बैठकीनंतर, खासदार संजय दिना पाटील, नगरसेवक व सर्व अधिका-यांनी स्टेशन परिसराची पाहणी करुन स्टेशन रोड परिसर कशा प्रकारे प्रवाशांसाठी सुटसुटीत करता येईल दृष्टीने चर्चा केली.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...

मुंबईकरांनी पाण्याचा...

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी...

नालेसफाईच्या नावावर...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई...