हैडलाइन

सिडकोमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

सिडको महामंडळामध्ये 2026 या वर्षीचा महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी *डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको आणि श्री. सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको  हे विशेष अतिथी म्हणून तर श्रीमती स्मिता शिरोडकर, अतिरिक्त मुख्य नियोजनकार, सिडको या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून  उपस्थित होत्या. तसेच श्री. सुभाष पाटील, अध्यक्ष, सिडको एम्प्लॉईज युनियन, श्री. नितीन कांबळे, सरचिटणीस, सिडको एम्प्लॉईज युनियन, डॉ. मनिष सोनटक्के, कन्सल्टंट, ऑर्थोपेडिक व स्पाइन सर्जन, कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई, डॉ. प्रतिक्षा कदम, चिफ डाएटिशियन, कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई* यांसह सिडकोतील महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

                   

या प्रसंगी बोलताना श्री. सुरेश मेंगडे यांनी वेगवेगळ्या काळांतील कर्तृत्वावान स्त्रियांचे दाखले देऊन, स्त्रिया सक्षम झाल्याने संपूर्ण समाजाची प्रगती होते असे मत व्यक्त केले.  

            

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. या प्रसंगी मार्च 2026 अखेरीस निवृत्त होणाऱ्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरीस डॉ. मनिष सोनटक्के आणि डॉ. प्रतिक्षा कदम यांनी उपस्थित महिला कर्मचाऱ्यांस आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

               


Most Popular News of this Week

कोकण विभागीय माहिती...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अमोल महाजन यांनी आज विभागीय माहिती...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

वृक्षांना इजा पोहोचवणे आणि...

मुंबईतील वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल अबाधित राखण्यासाठी...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

मुंद्रा पोर्ट ने रचा इतिहास,...

अदाणी पोर्ट्स के प्रमुख बंदरगाह मुंद्रा पोर्ट ने भारत के समुद्री एवं...