हैडलाइन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे टिळक भवन येथे सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन

पवित्र रमजान महिन्यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दादर येथील टिळक भवन येथे सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या इफ्तार कार्यक्रमात विविध धर्मीय बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.


या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रमुख उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष तथा माजी आमदार वजाहत मिर्झा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, एससी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, शाह आलम शेख, निझामुद्दीन राईन, जावेद फारुकी, जिशान अहमद यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रमजानच्या पवित्र महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या या सर्वधर्मीय इफ्तार कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात सौहार्द, परस्पर विश्वास आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी देशात शांतता, सद्भावना आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.



Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...