हैडलाइन

नवी मुंबईतील विकास कामांना गती – आमदार मंदाताई म्हात्रे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर व घन चर्चा

 नवी मुंबईतील विविध प्रलंबित व महत्त्वाच्या विकासकामांबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी दि. 13/04/2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयातील दालनात भेट घेऊन सविस्तर व गंभीर चर्चा केली. या बैठकीत नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी खालील महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

नवी मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्याबाबत सखोल चर्चा झाली. यामुळे गोर गरीब जनेतला सुरक्षित व सुसज्ज निवास उपलब्ध होणार आहे.महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी ‘उमेद मॉल’ उभारण्याकरिता नवी मुंबईमध्ये 1000 चौ.मी.चा भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.

बेलापूर येथे प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज प्रकल्पाला लवकरात लवकर गती देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकल्पांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असून, या बैठकीमुळे शहराच्या पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि महिला सक्षमीकरणाला नवी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

मध्य रेल्वेच्या भोंगळ...

मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा आणि विस्कळीत वेळापत्रकाचा फटका सोमवारी...