हैडलाइन

सुनेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणणे हीच दादांना खरी श्रध्दांजली

सुनेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले. तसे करणे हीच स्वर्गीय अजितदादा पवार यांना खरी श्रध्दांजली ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

२३ एप्रिल रोजी पार पडणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. यापार्श्वभूमीवर आज बारामती येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला शिंदे यांनी दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

 शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना सुरूवातीला अजितदादांच्या स्मृतीला अभिवादन केले. अजितदादांच्या निधनानंतर बारामती मधल्या घराघरांमध्ये आपला माणूस गेल्याची भावना होती. अशा पार्श्वभूमीवर ही निवडणुक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा होती.


पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मी तुमच्यासमोर केवळ राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून उभा आहे.  आपल्याला केवळ लोकप्रतिनिधी निवडायचा नाही, तर आपल्या परिसराचा स्वाभिमान आणि विकासाचा वारसा पुढे नेणारी व्यक्ती निवडायची आहे.  स्वर्गीय अजित दादांनी बारामतीच्या विकासासाठी कशाप्रकारे मेहनत घेतली आहे हे आपणाला माहितच आहे.  आज शिवसेना, महायुतीच्या माध्यमातून आपण सुनेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलो असून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.  

सुनेत्रा वहिनी बारामतीच्या प्रत्येक कुटुंबाचा, शेतकऱ्याचा, महिलांचा आणि तरुणांचा आवाज त्या बनतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. सुनेत्रा वहिनींना तुम्ही अनेक वर्षांपासून जवळून पाहिलं आहे. सत्तेत असो किंवा नसो, सामान्यांच्या सुखा-दुःखात धावून जाणं आणि संयमाने प्रश्न सोडवणं हा त्यांचा स्वभाव आहे.  राजकारणापेक्षा समाजकारणावर त्यांनी नेहमीच भर दिला.  घराची जबाबदारी सांभाळत असतानाच, समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिल्याची भावना मी व्यक्त केली. 

ही निवडणूक विकासाची आणि विश्वासाची आहे. ज्या हातांनी नेहमी मदतीचा आधार दिला, त्या हातांना आज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. अजितदादा पवार यांनी बारामतीसाठी केलेल्या विकास कामांची परंपरा अधिक वेगाने पुढे नेण्याचं काम सुनेत्राताई करतील. आम्ही सर्वजण एकत्र येऊन बारामतीला आणखी सक्षम, समृद्ध आणि आधुनिक बनवू, अशी ग्वाहीही यावेळी दिली. 

सुनेत्रा वहिनी या आपल्या भगिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावं. आपल्या डोळ्यासमोर फक्त आपल्या भागाचा विकास आणि येणाऱ्या पिढीचं भविष्य ठेवा. आमचे शिवसैनिक सुनेत्रा वहिनींना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असा विश्वास  मी बारामती मधील माझ्या लाडक्या बहिणी, भावांना दिला.

यावेळी मंत्री उदय सामांत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



Most Popular News of this Week

वाढदिवसाचा स्नेहस्पर्श -...

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १८ एप्रिल २०२६) आपल्या...

६२व्या इन्स्टॉलेशन सोहळ्यात...

शनिवारी सायंकाळी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार हे केवळ एका नेतृत्वबदलाचे...

भाजपाला महिलांना आरक्षण...

महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून भारतीय जनता पक्ष फक्त राजकीय पोळी...

महाराष्ट्र के 300 से अधिक...

चेतना एजुकेशन लिमिटेड और स्कूल वेलफेयर मैनेजमेंट फोरम के संयुक्त...

महिला आरक्षणावर खुल्या...

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पण...

"आयुक्त अश्विनी भिडे यांची...

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एच पश्चिम विभागातील...