हैडलाइन

"आयुक्त अश्विनी भिडे यांची वांद्रे पश्चिममध्ये पहाटे आकस्मिक पाहणी; स्वच्छतेवर दिला भर"

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एच पश्चिम विभागातील वांद्रे (पश्चिम) येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या धर्मशाळा चौकी, शासकीय तंत्रनिकेतन वांद्रे पश्चिम समोरील खेरवाडी येथे आज पहाटे आकस्मित भेट दिली व कर्मचाऱ्यांसमवेत संवाद साधला. तसेच, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरीपटाची तपासणी केली.

एच पश्चिम विभागातील रस्ते स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, बस थांबे आदी ठिकाणच्या स्वच्छतेकडे व्यापक लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागाने (वॉर्ड ) मुंबई अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यासाठी परस्परांमधील समन्वय अधिक वाढवावा, अशा सूचनादेखील आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिल्या. 

उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (परिमंडळ ३ )  विश्वास मोटे, सहायक आयुक्त दिनेश पल्लेवाड आदी उपस्थित होते.



Most Popular News of this Week

कोकण विभागीय माहिती...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अमोल महाजन यांनी आज विभागीय माहिती...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

वृक्षांना इजा पोहोचवणे आणि...

मुंबईतील वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल अबाधित राखण्यासाठी...

सचिन अहिर यांच्या...

महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली...