हैडलाइन

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी तीन विभाग कार्यक्षेत्रांमधील विविध ठिकाणांची केली आकस्मिक स्थळ पाहणी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील रस्ते स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नाले स्वच्छता, बस थांबे आदी ठिकाणच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) विपिन शर्मा यांनी आज दिल्या आहेत. त्यांनी आज पश्चिम उपनगरातील ३ विभाग कार्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणांची आकस्मिक पाहणी केली. 

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी पश्चिम उपनगरांतील एच पूर्व, पी उत्तर आणि पी दक्षिण या विभागांमधील विविध ठिकाणांना आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विभागांमधील परिसर स्वच्छता आणि नाले स्वच्छतेच्या कामांचा पाहणी केली. त्यानंतर त्यांनी 'एच पूर्व' विभागाच्या सहाय्यक आयुक्त  मृदुला अंडे, 'पी उत्तर' विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी आणि 'पी दक्षिण' विभागाचे सहायक आयुक्त अनिरूद्ध कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनी संवाद साधला. या दूरध्वनी संवादा दरम्यान त्यांनी संबंधित सहाय्यक आयुक्त यांना विविध बाबींच्या अनुषंगाने निर्देश दिले आहेत.


पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. कंत्राटदाराने काढलेला ओला गाळ ४८ तासानंतरच त्याचे वहन होत आहे की नाही, याकडेही संबंधित अभियंत्यांनी प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे. तसेच सहायक आयुक्तांनी संबंधित अभियंत्यांकडून या सर्व कामाचा दररोज आढावा घ्यावा, अशा सूचनाही शर्मा यांनी आजच्या आकस्मिक पाहणीनंतर संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.

'पी दक्षिण' विभागातील दाजीवाडी भाजी मंडई, राणीसती मार्ग मंडी परिसरातील स्वच्छता कामांचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच तिनही विभागातील उड्डाणपुलांखालील आणि परिसरातील कचरा हटवून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, असे निर्देशही शर्मा यांनी आजच्या आकस्मिक पाहणीनंतर दिले आहेत.



Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...

मुंबईकरांनी पाण्याचा...

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी...

नालेसफाईच्या नावावर...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई...