हैडलाइन

मुंबईच्या प्रथम नागरिक, महापौर श्रीमती रितूताई तावडे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य आणि सार्वजनिक सेवांना अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख बनविण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आज लोकार्पण आणि शुभारंभ सोहळे उत्साहात संपन्न झाले. 


लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय (सायन हॉस्पिटल) संलग्नित लोकनेते एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र, धारावी येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज बालरोग, रक्तदोष, कर्करोग व बोनमॅरो ट्रान्सप्लांट सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. 

जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या केंद्रामुळे रक्तदोष आणि कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना अधिक आधुनिक व सुलभ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. विशेषतः बोनमॅरो ट्रान्सप्लांटसारखी जटिल उपचार सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणे ही आरोग्य क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची बाब मानली जात आहे.


तसेच सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व रा. ए. स्मा. रुग्णालय, परळ (KEM) येथे नवजात अतिदक्षता विभाग (NICU), अत्याधुनिक मॅमोग्राफी मशीन, सर्जिकल पॅथॉलॉजी सेमिनार हॉल आणि फिजिओलॉजी सेमिनार हॉलचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. या सुविधांमुळे नवजात बालकांना अधिक दर्जेदार उपचार, महिलांसाठी अत्याधुनिक आरोग्य तपासणी सुविधा तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि डॉक्टरांना संशोधन व प्रशिक्षणासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना मुंबईच्या प्रथम नागरिक तथा महापौर रितू तावडे , सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे, संबंधित रुग्णालयांचे अधिष्ठाता, डॉक्टर, कर्मचारी, संस्थांचे पदाधिकारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week

कोकण विभागीय माहिती...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अमोल महाजन यांनी आज विभागीय माहिती...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

वृक्षांना इजा पोहोचवणे आणि...

मुंबईतील वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल अबाधित राखण्यासाठी...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

मुंद्रा पोर्ट ने रचा इतिहास,...

अदाणी पोर्ट्स के प्रमुख बंदरगाह मुंद्रा पोर्ट ने भारत के समुद्री एवं...