हैडलाइन

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे प्रत्यक्ष भेटीप्रसंगी निर्देश

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान विस्तारित टप्प्याची  बांधकाम गुणवत्ता चांगली असल्याचे प्रत्यक्ष पाहणीवेळी आढळून येत आहे. तथापि, काही ठिकाणी आढळणारे लहान उंचवटे काढून टाकावेत, रस्त्याच्या कडा योग्य कराव्यात आणि इतर काही किरकोळ कामे (फिनिशिंग टचेस) असल्यास ती पूर्ण करावीत. तसेच, उड्डाणपुलाच्या दुतर्फा हिरवळीचा अनुभव येईल, अशा रीतीने व्हर्टिकल गार्डन किंवा अन्य योग्य पर्याय अवलंबून हिरवळ विकसित करावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत.

महापौर रितू तावडे यांनी गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले. स्थानिक नगरसेवक संदीप पटेल, नगरसेविका प्रीती सातम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) उमेश बोडके यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. 


महापौर तावडे यांनी मृणाल गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्यावर सर्व संबंधितांसह प्रत्यक्ष फिरून पाहणी केली. ठिकठिकाणी बांधकाम, भौमितिक रचना, वक्राकार वळण आणि त्या संदर्भात करावी लागणारी अभियांत्रिकी प्रक्रिया, बांधकाम सांधे याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी अभियंत्यांकडून जाणून घेतली.

संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलावरील वाहन मार्गावर ४० मिलिमीटर जाडीचा मास्टिक अस्फाल्ट हा वेअरिंग कोर्स म्हणजे पृष्ठभाग प्रदान करण्यात आला आहे. वाहतूक सुरू करण्यापूर्वी ओबडधोबड आणि असमान वाटणारा हा पृष्ठभाग प्रत्यक्षात रस्त्याचा वापर जसा जसा होत जातो तसा तसा अधिक समतल होत जातो आणि दृश्य स्वरूपात हा ओबडधोबडपणा कमी होतो. नव्याने बांधलेल्या रस्त्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि जलरोधक गुणधर्म, दीर्घकालीन टिकाऊपणा तसेच गंजविरोधीक्षमता व दीर्घ सेवा आयुष्य यामुळे या तंत्रज्ञानाचा पुलांवर उपयोग केला जातो, अशी माहिती अभियंत्यांनी दिली. 

सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पाहणीअंती या उड्डाणपुलाची गुणवत्ता चांगली असल्याचे जाणवते आहे. तथापि लहान लहान आढळलेले ओबडधोबड भाग / उंचवटे काढून टाकणे, रस्त्याच्या कडा योग्य करणे, अधिकचे दिशादर्शक फलक लावणे, रस्त्याच्या दुतर्फा हिरवळीचा अनुभव यावा यासाठी व्हर्टिकल गार्डन किंवा योग्य तो पर्याय अवलंबून हिरवळ विकसित करणे, इत्यादी कामे पूर्ण करावीत. अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कालावधी लोटल्यानंतर संपूर्ण पुलावर समतल रस्त्याचा अनुभव येईल, असे महापौरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नमूद केले.



Most Popular News of this Week

कोकण विभागीय माहिती...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अमोल महाजन यांनी आज विभागीय माहिती...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

वृक्षांना इजा पोहोचवणे आणि...

मुंबईतील वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल अबाधित राखण्यासाठी...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

सचिन अहिर यांच्या...

महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली...