हैडलाइन

संजीव उपाध्याय यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार मुंबई विभागीय उपाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी मुंबई विभागीय कार्यकारिणीची घोषणा केली असून, संजीव उपाध्याय यांची मुंबई विभागीय उपाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच मुंबई विभागीय अध्यक्ष आणि माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.

संजीव उपाध्याय यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले असून, मुंबई विभागात पक्षाचा विस्तार आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत ही जबाबदारी सोपवली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी ही पुनर्नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. पक्षाची धोरणे आणि जनहिताचे विषय अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

संजीव उपाध्याय यांच्या पुनर्नियुक्तीनंतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करत आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

मध्य रेल्वेच्या भोंगळ...

मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा आणि विस्कळीत वेळापत्रकाचा फटका सोमवारी...