हैडलाइन

"विद्यार्थ्यांच्या पाठीशी वंचित ठाम" – चुनाभट्टी पोलीस स्टेशन मध्ये सुजात आंबेडकरांचे वक्तव्य

दिल्लीमध्ये NEET परीक्षेसंदर्भात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना मुंबईतील चुनाभट्टी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात जाऊन ताब्यात असलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, विद्यार्थ्यांवर कोणत्याही परिस्थितीत लाठीचार्ज होऊ देणार नाही. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे वकील त्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी पक्ष कायम ठामपणे उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या...

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. भाजपा...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...

सूखे को लेकर केंद्र सरकार से...

महाराष्ट्र में भीषण सूखे की स्थिति को लेकर शिवसेना के मुख्य नेता और राज्य...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...