हैडलाइन

शाडू मातीची मूर्ती, पर्यावरणपूरक आरास आणि महानगरपालिका शाळेतील चिमुरड्या रितिकच्या कलेचा विशेष सन्मान

श्रीगणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी अर्थात महापौर बंगल्यावर विघ्नहर्त्या श्रीगणरायाची अत्यंत भक्तिभावाने व मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. दीड दिवसांच्या या लाडक्या बाप्पाच्या आगमनाने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

​महापौर निवासस्थानावरील श्रीगणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरकतेला दिलेले प्राधान्य होय. महापौर निवासस्थानी विराजमान झालेली मूर्ती ही पर्यावरणपूरक शाडू मातीची आहे. आरास देखील विविध फुले व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून साकारण्यात आली आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित प्रभादेवी महानगरपालिका शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी रितिक पासवान याने स्वतःच्या हाताने बनवलेली, शाडू मातीची छोटी गणेशमूर्ती मागील आठवड्यात महापौरांना भेट दिली होती. त्या बालसुलभ कलेचा आणि भावनेचा सन्मान राखत, महापौरांनी या मूर्तीचीही निवासस्थानी प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी रितिक व त्याची आई उपस्थित होते. आपल्या हाताने साकारलेला बाप्पा थेट महापौरांच्या घरी पुजला जात असल्याचे पाहून रितिक व त्याच्या मातेचा आनंद गगनात मावत नव्हता.


यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, ​"महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असलेल्या श्रीगणेशोत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा प्रदान करते. लाडका बाप्पा आपल्या मुंबई नगरीवर कृपादृष्टी ठेवो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्रदान करो, हीच प्रार्थना," अशा शब्दांत महापौर रितू तावडे यांनी भावना व्यक्त केल्या.



Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...