हैडलाइन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने चेंबूर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने  चेंबूर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन


मुंबई: करोनामुळे सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुडवडा भरून काढण्यासाठी बुधवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने चेंबूर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कॉंग्रेच्या अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

       राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सध्या सर्वच ठिकाणी रक्ताचा मोठा तुटवडा आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर महाविद्यालयात बुधवारी महारक्तदान शिबीराचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स मार्फत केले. तर या कार्यक्रमाला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, प्रभारी अध्यक्ष आणि आयोजक चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप, अशोक चव्हाण,  बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नसीम खान हे प्रत्यक्षात उपस्थित होते. रक्तदान शिबिरांनंतर काँग्रेस नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत याठिकाणी सभा देखील पार पडली. यामध्ये दिल्ली मधील अनेक मोठ्या नेत्यांनी सहभाग घेतला होता.


Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या...

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. भाजपा...

सेवा संकल्प अभियान महिला व...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

सूखे को लेकर केंद्र सरकार से...

महाराष्ट्र में भीषण सूखे की स्थिति को लेकर शिवसेना के मुख्य नेता और राज्य...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...