हैडलाइन

पुस्तकप्रेमी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृह' निवासस्थान समोरील बी. एन. वैद्य उद्यानात मोफत वाचनालयाचे उद्घाटन

पुस्तकप्रेमी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृह' निवासस्थान समोरील  बी. एन. वैद्य उद्यानात मोफत वाचनालयाचे उद्घाटन


मुंबई: दादर मधील हिंदू कॉलनीत बी. एन. वैद्य उद्यानात कॉर्पोरेट सामाजिक दायित्‍व (CSR) च्‍या माध्‍यमातून रविवार पासून मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादरमध्ये खास वैयक्तिक ग्रंथालयाकरीता 'राजगृह' या बंगल्याच्या रूपाने निवासस्थान बांधले होते. या राजगृह समोरच सदर उद्यान स्थित आहे.


या खास वाचनालयाच्या शुभारंभ प्रसंगी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱ्हाडे, उपायुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.


बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या उद्यान विभागामार्फत विविध उद्यानांमध्‍ये कॉर्पोरेट सामाजिक दायित्‍वाच्‍या माध्‍यमातून, महानगरपालिकेच्‍या २४ प्रशासकीय विभागात प्रत्येकी एक याप्रमाणे २४ वाचनालय टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. या शृंखलेतील तिसऱ्या वाचनालयाचा प्रारंभ आज झाला आहे.


याबाबत अधिक माहिती देताना उद्यान अधीक्षक श्री. परदेशी यांनी सांगितले की, आजच्‍या सोशल मीडिया आणि मोबाईलच्‍या दुनियेत हरविलेल्‍या नव्‍या पिढीला वाचनामध्‍ये रस निर्माण करून एक समृद्ध समाज निर्मितीचा आमचा प्रयत्‍न आहे. या वाचनालयांमध्‍ये विविध महापुरुषांची जीवन चरित्र, इतिहास,निसर्ग विषयक,  वृक्ष-फुले-फळे, आरोग्‍य, चांगली जीवन शैली अश्या निरनिराळ्या विषयांची पुस्तके समाविष्ट आहेत. तसेच लहानग्‍यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास व्‍हावा, या हेतूने विविध बोधपर गोष्‍टी तसेच खेळ आणि व्‍यायामाविषयी आवड निर्माण व्‍हावी म्‍हणून त्‍या संदर्भातील पुस्‍तकेही या वाचनालयांमध्‍ये उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानवंत आणि पुस्तकप्रेमी. राजगृहातील त्यांचे ग्रंथालय देखील खासच. त्यामुळे बाबासाहेबांच्या निवासस्थानासमोर उद्यानात सुरू केलेले मोफत वाचनालय हे वाचन प्रेमींना विशेषतः विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया श्री. परदेशी यांनी दिली.



Most Popular News of this Week

महात्मा फुले जयंती पर मुंबई...

 महात्मा जोतीराव फुले की १९९वीं जयंती के शुभ अवसर पर बहुजन, ग्रामीण एवं...

संसदीय राजनीति में रामदास...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) के राष्ट्रीय अध्यक्ष और केंद्रीय राज्य...

नवी मुंबईतील विकास कामांना...

 नवी मुंबईतील विविध प्रलंबित व महत्त्वाच्या विकासकामांबाबत आमदार मंदा...

SAMUDRA SAHAS SAILING EXPEDITION FLAGGED OFF FROM MUMBAI AS PART OF REGIMENT OF...

The Samudra Sahas Sailing Expedition, undertaken by the Regiment of Artillery as part of its bicentenary celebrations, was ceremonially flagged off by Lieutenant General N. S. Sarna, PVSM, AVSM, SM,...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...

महामानव भारतरत्न...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ठाणे...