हैडलाइन

मुंबईत विडिओ जर्नालिस्ट यांच्यावर गर्दूल्यांचा हल्ला

 मुंबईत विडिओ जर्नालिस्ट यांच्यावर गर्दूल्यांचा हल्ला


●ग्लोबल चक्र न्यूज

मुंबई: चेंबूरच्या टिळकनगर भागातील पेस्तम सागर, वाल्मिकी नगर येथील एका विडिओ जर्नालिस्ट (टीव्ही कॅमेरामन) वर गर्दुल्यानी मंगळवारी रात्री (13  सप्टेंबर) साडेनऊ वाजता प्राणघातक हल्ला केला. मोहन कन्हैयालाल दुबे असे या विडिओ जर्नालिस्टचे नाव असून सध्या त्याला उपचारार्थ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हल्लाखोर या घटनेनंतर फरार झाला आहेत. मात्र त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली. 

चेंबूर जय भवानी सेवा संघ, सीकेपी बँकेजवळ काल रात्री आपल्या आईची ऑनलाईन मागवलेली औषधे येणार असल्याने मोहन दुबे हे वाट पहात उभे होते. त्यावेळी पाठीमागून येऊन अचानक युसुफ बरकत शेख नावाच्या नशाबाजानी त्यांच्यावर चाकूने कमरेवर वार केला. त्यात ते जखमी झाले असून, त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे गर्दुल्ले या भागात रस्त्यावरही अनेकजण एकत्र येऊन नशा करत असतात. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दुबे यांनी त्यांना हटकले होते. त्याचा राग धरून हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. 


दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फरार आरोपी हा गेल्या 15 दिवसापूर्वी त्याच्या मित्रांसोबत पेस्तम सागर रोड नंबर 5 येथे गांजा पित असताना फिर्यादी दुबे यांनी  त्यांच्या परिसरात गांजा पिऊ नका म्हणून त्यांना हटकले होते. त्यावेळी या आरोपींनी त्यांना धमकी दिली होती. त्यानंतर तोच राग मनात ठेऊन आरोपींनी फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पाठीवर डाव्या बाजूस कमरेवर चाकू भोकसुन गंभीर जखमी केले. याबाबत टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हल्यानंतर आरोपी पसार झाला आहे. मात्र आमचा शोध सुरू आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल असे टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी सांगितले.



Most Popular News of this Week

नालेसफाईच्या नावावर...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई...

राहुल शेवाळे यांच्या...

शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीने इयत्ता KG, Sr. KG व इयत्ता पहिलीमध्ये...

वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप...

'पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६' मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या...

पिण्याच्या पाण्याच्या...

'अल नि‍नो'मुळे पावसाने ओढ दिल्‍याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा...

दिव्यांगांच्या सर्वांगीण...

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि...

शाळेच्या पहिल्या दिवशी...

जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित...