हैडलाइन

अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय अध्यक्षांच्या जागतिक महिला दिनाच्या प्रस्तावावर आमदार मंदाताई म्हात्रे यांचे मनोगत..

मुंबई - नारी शक्तीच्या प्रेरणास्थानी असलेल्या मा आई जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची या पुण्यभूमीत महिला सक्षमीकरन व बळकटीकरनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या पाहिजे असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय अध्यक्षांच्या प्रस्त्वावर चर्चा केली. तसेच महिला सक्षमीकरण व सबलीकरण म्हणजे महिलांना समाजात समान हक्क, संधी, स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याची क्षमता मिळवून द्यावी असेही प्रतिपादन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले. यामुळे महिलांना स्वतःचे जीवन, शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सामाजिक स्थान याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेता येतील.  तसेच महिलांना शिक्षण, आर्थिक साधने, कायदेशीर हक्क आणि सामाजिक आदर देऊन त्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्याची प्रक्रिया शासनाने केली पाहिजे. महिला सक्षमीकरणाचे महत्त्व म्हणजे समानता: पुरुष आणि महिलांमध्ये समान हक्क निर्माण करणे. तसेच कुटुंब व समाजाचा विकासामध्ये शिक्षित आणि सक्षम महिला कुटुंबाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलणे. महिलांना स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याची ताकद देणे. तसेच शिक्षणाचा प्रसार रोजगार व आर्थिक स्वावलंबन कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणें. तसेच राजकारण व सामाजिक क्षेत्रात सहभाग महिलांचा सहभाग वाढवणे.

भारत सरकारने महिलांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. उदाहरणार्थ:

“बेटी बचाओ बेटी पढाओ योजना”

“सुकन्या समृद्धी योजना” “उज्ज्वला योजना” तसेच महिला सक्षमीकरण हे केवळ महिलांसाठीच नाही तर संपूर्ण समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहे. महिलांना समान संधी आणि आदर दिल्यास समाज अधिक प्रगत आणि समतोल होऊ शकतो. या संबंधी प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षा असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शासनाकडे विचार मांडले.


Most Popular News of this Week

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...