हैडलाइन

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून झाडांची विशेष काळजी

वाढत्या तापमानाचा मुंबई महानगरातील वृक्षसंपदेवर प्रतिकूल परिणाम होऊ नये तसेच मुंबईकरांना गारवा मिळावा, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून झाडांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. झाडांच्या मुळांना पुरेसे पाणी न मिळाल्यास ती कमकुवत होऊन झाडे उन्मळून पडण्याची शक्यता निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन झाडांसाठी असे पाणी पुरवून संजीवनी देण्यासाठी महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. पिण्यासाठी अयोग्य असलेले, परंतु झाडांसाठी पोषक असलेले पाणी यासाठी वापरण्यात येत आहे. 


सार्वजनिक ठिकाणांतील झाडांना महानगरपालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर, खासगी क्षेत्रातील झाडांसाठी संबंधित गृहनिर्माण संस्थांनी पाणीपुरवठा करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. अतिउष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि झाडांवर ताण वाढतो. परिणामी, झाडांची मुळे कमकुवत होऊन जमिनीवरील पकड सैल पडण्याची शक्यता वाढते. तसेच झाडांच्या फांद्या कोरड्या व ठिसूळ होऊन तुटण्याचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून झाडांना नियमित पाणी देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत रस्ते स्वच्छता मोहिमेदरम्यान पाण्याच्या टँकरद्वारे झाडांना पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जी दक्षिण विभागात केशवराव खाड्ये मार्ग तसेच सांताक्रुझ व जुहू परिसरात स्वच्छता अभियानासोबत झाडांना पाणी देण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. उद्यान विभागाकडूनही मुंबईतील विविध भागांत झाडांची निगा राखणे, आवश्यक ठिकाणी पाणीपुरवठा करणे तसेच झाडांच्या आरोग्याची पाहणी करणे, ही कामे सातत्याने सुरू आहेत.


वृक्षतज्ज्ञांच्या मते, झाडांना वेळेवर पाणी मिळाल्यास त्यांच्या अंतर्गत पाणी वहन प्रक्रियेस मदत होते व उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी होतो. त्यामुळे फांद्या सुकणे, ठिसूळ होणे किंवा झाडांची स्थिरता कमी होणे यांसारख्या समस्या काही प्रमाणात टाळता येतात. उन्हाळ्यात झाडांचे जतन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या परिसरातील तसेच गृहनिर्माण संस्थांच्या आवारातील झाडांना वेळोवेळी पाणी घालावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



Most Popular News of this Week

कोकण विभागीय माहिती...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अमोल महाजन यांनी आज विभागीय माहिती...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...

मुंद्रा पोर्ट ने रचा इतिहास,...

अदाणी पोर्ट्स के प्रमुख बंदरगाह मुंद्रा पोर्ट ने भारत के समुद्री एवं...

कोकणवासीयांची प्रतीक्षा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस...