हैडलाइन

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडीया व्यवस्थापनाला दणका

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व दडपशाही विरोधात अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघाचे सरचिटणीस सुहास माटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विमानतळाजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या या तीव्र आंदोलनामुळे अखेर एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाला झुकावे लागले व कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात आल्या.


कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या तीव्रतेमुळे अखेर एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाला झुकावे लागले. कामगारांच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र सचिव राजेंद्र भिसे, अजित आचरेकर उपस्थित होते. तसेच एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून सहाय्यक महाव्यवस्थापक महेश कांबळे, मानव संसाधन व्यवस्थापक सुनीता भरदोज आणि त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाला प्रत्यक्ष आंदोलनाच्या स्थळी येऊन थेट कामगारांची भेट घेतली. या आंदोलनास सर्व कामगार बांधव व पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आणि आंदोलन यशस्वी केले. कामगारांच्या एकजुटीमुळेच हा लढा अधिक मजबूत झाला असून भविष्यातही कामगारांच्या हक्कांसाठी संघटना कायम ठामपणे उभी राहील असे आश्वासन अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...